#महिला दिन सह रंगपंचमी साजरी!
संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरासह तालुक्याच्या अनेक गावात रविवारी दि. ८ रोजी रंग पंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
खानापूर शहरातील मयेकरनगरात रविवारी सकाळ पासुन लहान मुलापासुन महिलानी रंग उधळण्यास सुरूवात केली.
मयेकरनगरातील महिलानी गाण्याच्या तालावर ऱंगाची उधळन करत तीन तास रंग पंचमी सनाचा आनंद लुटला.
रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने शाळकरी मुलासह शिक्षिका ,नोकरवर्गानी मनखुलास रंगपंचमीचा आनंद लुटला.
# रंगपंचमी व महिला दिन एकत्रीत आनंद!
यंदाची रविवारची रंग पंचमी ही महिला दिन दिवशीच आल्याने महिलाना दुहेरी आनंद मिळाला.त्यामुळे महिलानी सकाळी रंग पंचमी साजरी केली. तब्बल तीन तास रंगात नाहुन गेलेल्या महिल्यानी महिला दि नीचे औचित्य साधुन केक कापला. व महिला दिन साजरा केला.
या वेळी मयेकरनगरातील महिला मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या.

