#शिव स्मारक चौक, तहसील कार्यालयात शिवजयंती साजरी!
संदेश क्रांति न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरासह विविध ठिकाणी गुरूवारी दि.१९ फेब्रुवारी रोजी ३९४ वी शिव जयंती मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली.
खानापूर शहरातील शिवस्मारक चौकात छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार दिगंबरराव यशंतवराव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज्याच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन अभिवादन केले.त्याचबरोबर तहसीलदार दुंडाप्पा कोमार यानी अभिवादन केले.
तसेच तहसील कार्यालयात शिव जयंती उत्साहात पार पडली.
या वेळी माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले की,खानापूर तालुका हा बहुसंख्य मराठा समाज व मराठी भाषिक नागरिक वास्तव्यास आहेत. त्यामुळे प्रत्येकाने छत्रपती शिवरायांचे चरित्र आणि विचार अंगीकारले पाहिजेत.शिवरायाचे आदर्श आचरणात आणल्यास खर्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल.तसेच प्रत्येकाच्या घरामध्ये शिवचरित्र असणे गरजेचे असल्याचे सांगत शिवरायाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगावे . असे आवाहन केले.
या वेळी शिवजंयती उत्सवाला मा जी आमदार दिगंबर पाटील, तहसीलदार दुंडाप्पा कोमार, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब शेलार, श्रीकांत दामले , बी बी पाटील,धनंजय देसाई,अजित पाटील,विनायक सावंत, अँड.चेतन मणेरीकर,बाळाराम सावंत तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.
