संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील मध्यवर्ती शिवजयंती उत्सवाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असून या ऐतिहासिक वर्षानिमित्त शतकमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यासाठी शनिवारी सायंकाळी ७ वाजता मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाची जाहीर बैठक शहरातील ज्ञानेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आली आहे.
शतकमहोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक, सामाजिक व ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून शिवभक्तांसाठी विशेष उपक्रम राबवण्याचा मानस मंडळाने व्यक्त केला आहे. मिरवणूक, , शिवचरित्र तसेच समाजोपयोगी उपक्रमांचा समावेश करण्याबाबत चर्चा होणार आहे.
तरी सर्व शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बैठकीत सहभागी व्हावे. व आपले मौल्यवान सूचना द्याव्यात, असे आवाहन मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
