#वनखात्याचे कर्मचारी शिवारीत!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निलावडे ग्राम पंचायतीच्या हद्दीतील आंबोळी, बांदेकरवाडा गावच्या शिवारात गेल्या अनेक दिवसापासुन हत्तीनी उभ्या केळी झाडांचा , नुकताच लावण्यात आलेल्या मिरची झाडाचा, तसेच नुकताच लावणी करून आलेल्या ऊस पिकांचा फाडशा पाडला आहे.
आंबोळी गावातील शेतकरी नामदेव गावडे व पुंडलिक गावडे यांच्या शिवारातील केळीची झाडे , ऊस, तसेच नुकताच लावणी केलेल्या मिरची पिता या फाडशा पाडला आहे.
तसेच बांदेकरवाडा गावातील शेतकरी भागाणा बांदेकर याच्या ही शिवारातील केली, ऊस, मिरची पिकाची प्रचंड नुकसान केली आहे.
याची दखल घेऊन खानापूर वनखात्याचे आरएफओ श्रीकांत पाटील आपल्या कर्मचार्यासोबत आंबोळी, बांदेकरवाडा शिवारात रात्रीच्यावेळी गस्त घालुन हत्ती पासुन पिकाचे संरक्षण व्हावे. यासाठी रोजच प्रयत्न सुरू आहेत.
मात्र केवळ दोन हत्ती याभागातुन बाहेर पडत नाहीत.त्यामुळे ते केव्हा शिवारात फिरतील याचा नेम नाही.त्यामुळे हत्तीकडुन पिकांचे नुकसान होत आहे.
यासाठी शेतकर्याच्या पिकाचे नुकसान झाले तरी सरकारकडुन लाखो रूपयाचा निधी मंजुर करून शेतकर्याना नुकसान भरपाई देण्यात येत आहे.अशी माहिती वनखात्याचे आरएफओ श्रीकांत पाटील यानी दिली.
आजुन वनखात्याकडुन रात्रनदिवस हत्तीच्या हालचालीवर नजर ठेवून आहेत