#जांबोटी सोसायटीचे संस्थापक चेअरमन,म.ए. समितीचे ज्येष्ठ नेते विलास बेळगावकर यांच्या हस्ते उद्घाटन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
मच्छे (ता. बेळगाव ) येथील शिंदे कॉलनी जांबोटी रोड येथे नवीन पाणी शुद्धीकरण प्लांट अक्वा सुपर जल चालू करण्यात आले आहे.
याचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक 23 रोजी सायंकाळी पाच वाजता जांबोटी सोसायटीचे संस्थापक चेअरमन व खानापूर म.ए.समितीचे ज्येष्ठ नेते विलास बेळगावकर यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी जांबोटी सोसायटीचे संचालक कुशाप्पा नाईक, पुंडलिक नाकाडी, अण्णासाहेब कुडतुरकर, अनिल शिंदे, गंगाराम बावदाने, वाघू पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भैरू पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व फोटो पूजन करण्यात आले
यावेळी उद्घाटन प्रसंगी बोलताना जांबोटी सोसायटीचे संस्थापक चेअरमन व खानापूर म.ए. समिती ज्येष्ठ नेते विलास बेळगांवकर म्हणाले की, अलीकडे प्रत्येकाला शुद्ध पिण्याच्या पाण्याची नितांत गरज आहे. प्रत्येक जण आपले आरोग्य चांगले कसे राहील याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन असतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी शुद्ध पिण्याचे पाण्याची नितांत गरज आहे. हा दृष्टिकोन ठेवून समाजसेवक भैरू पाटील व सोमनाथ शिंदे यांनी मच्छे येथील शिंदे कॉलनी जांबोटी रोड या ठिकाणी अक्वा सुपर जल हा पाणी शुद्धीकरण प्लांट उभा केला. त्यामुळे अनेक नागरिकांची शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय झाली. व नागरिकांनी या शुद्ध पाण्याचा वापर करून आपले आरोग्य मजबूत ठेवावे. असे आव्हान केले
तसेच कोणाला लग्न समारंभास साठी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमा साठी शुद्ध पाण्याचे गरज लागत असते. तेव्हा अक्वा सुपर जेल मच्छे यांना संपर्क करून , याचा लाभ घ्यावा. यासाठी भैरू पाटील सोमनाथ शिंदे. यांच्या मोबाईल नंबर
9449456602,,9035308706.. यावर संपर्क करावा .असे आव्हान केले.
कार्यक्रमाला विविध मान्यवर, ज्येष्ठ नागरिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार सोमनाथ शिंदे यांनी मानले.

