#सोमवारी पावती पुस्तकाचा उद्घाटन सोहळा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
चापगाव (ता. खानापूर) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेचा शतकमहोत्सव सोहळा येत्या फेब्रुवारी 2026 महिन्यात होणार आहे.
या अनुषंगाने शाळेच्या विकास कामासाठी व कार्यक्रमासाठी निधी संकलन करावयाचा आहे. त्यासाठी आम्ही शतक महोत्सव कमिटीच्या वतीने छापलेल्या पावती पुस्तकांचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक 24 रोजी सकाळी 11 वाजता विविध उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
पावती पुस्तकाचे उद्घाटन माजी विद्यार्थी यांच्या उपस्थित होणार आहे!
श्री. कृष्णा पाटील वड्डेबैल उपाध्यक्ष शिवसेना कर्नाटक राज्य, मुकुंदराव पाटील शिवोली उद्योजक, श्रीमती गंगव्वा कुरबर अध्यक्षा ग्रामपंचायत चापगाव, मुकुंद पुंडलिक पाटील रेणुका फर्टीलायझर्स चापगाव, नारायण विठ्ठल पाटील आल्लेहोळ गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर, वैजाप्पा रामा धबाले उद्योजक चापगाव, बी. ए.पाटील निवृत हायस्कूल मुख्याध्यापक चापगाव, शंकर घार्शी निवृत्त हायस्कूल शिक्षक चापगाव, यल्लाप्पा बी. सागर निवृत्त कृषी अधिकारी, मष्णू सुतार सुपर मार्केट चापगाव, परिश्रम बळवंत अंबुजी हायस्कूल शिक्षक चापगाव आदी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे.
तरी शतक महोत्सव कमिटीच्या सर्व सभासदांनी तसेच माझी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. व जास्तीत जास्त निधी जमवून हा शतक महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यासाठी व शाळेच्या विकास कामात हातभार लावण्याचे आवाहन शतक महोत्सव माजी विद्यार्थी उत्सव कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
