“
#शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचा १५वा स्थापना दिन संपन्न!
#गेल्या पंधरावर्षांपासून शांतिनिकेतन पब्लिक स्कूलची प्रगतीची यशस्वी घोडदौड!”
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
तोपिंनकट्टी (ता.खानापूर) श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलची गेल्या पंधरा वर्षापासून यशस्वी घोडदौड सुरू आहे.
गेल्या पंधरा वर्षात शांतिनिकेतन पब्लिक स्कूल सुरू करताना अनेक चांगल्या वाईट अनुभवाचे शिदोरी घेऊन आज आम्ही
पंधरावा स्थापना दिन साजरा करत आहोत. असे विचार संस्थेचे संस्थापक व आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी शांतनिकेतन पब्लिक स्कूलच्या 15 व्या स्थापना दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.
यावेळी पुढे ते म्हणाले की शांतिनिकेतन पब्लिक स्कूल सुरू करताना अनेक अडचणींवर मात करून ही शिक्षण संस्था उभारली आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना व गरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे हा आमचा हेतू होता.
यामागे आमच्या संचालकांचे प्रयत्न मोठे आहेत. काही विरोधकांनी शाळा बंद होण्यासाठी विरोध केला परंतु सर्वांना सामावून घेऊन ही शिक्षण संस्था अशीच पुढे आणली आहे. आज बेळगाव जिल्ह्यात नावाजलेले शिक्षण संस्था म्हणून ओळखले जात आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी प्रमुख वक्ते निवृत्त प्राध्यापक एन. के.काळे म्हणाले की शांतीनिकेतन पब्लिक स्कूल ही संस्था केली पंधरा वर्षे प्रामाणिक पणे विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करत आहे. ना फायदा ना तोटा या तत्त्वावर ही शिक्षण संस्था चालू आहे. केवळ विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी तालुक्यातील गरीब व शेतकरी कुटुंबातील मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळत आहे. याचा मला अभिमान आहे. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व आमदार विठ्ठलराव हलगेकर होते.
व्यासपीठावर मुख्य अतिथी म्हणून बेळगाव सरकारी टीचर्स कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक एन. के. काळे उपस्थित होते. तसेच शांतिनिकेतन प्री. युनिव्हर्सिटी व डिग्री कॉलेजचे चेअरमन व श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे संचालक प्राध्यापक बंडू मजुकर, त्याचबरोबर श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी प्राध्यापक राजेंद्र एस. पाटील व जॉईट सेक्रेटरी महादेव बांदीवडेकर, संचालक विठ्ठल करंबळकर, चांगाप्पा निलजकर, यल्लाप्पा तिरवीर, राजाराम हलगेकर, बाळगौडा पाटील, नारायण हलगेकर आधी उपस्थित होते.
प्रास्ताविक पी आर ओ सौ.मनिषा भोसले यांनी केले. उपस्थितांचे स्वागत प्राचार्या सौ. स्वाती कमल वाळवे यांनी केले.
प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व फोटो पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
शिक्षकासह कर्मचाऱ्यांचा सत्कार!
यावेळी गेली पंधरा वर्षे या शिक्षण संस्थेत सेवा बजावत असलेल्या शिक्षकासह कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला संस्थेचे संचालक ,सभासद, विद्यार्थी ,पालक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आभार सुवर्णा पाटील यानी मानले.
.
