#हत्तरवाड गावावर शोककळा!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
हत्तरवाड (ता खानापूर) गावचे शेतकरी गणपती नारायण हलसकर (वय ५४) यांना सोमवारी शेतात भात बांधणी करताना सर्प दंश झाल्याने मृत्यू झाला.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की सध्या तालुक्यात भात सुगी ला सुरुवात झाली आहे. हत्तरवाड गावचे गणपती हसलकर हे सोमवारी आपल्या शेतात भात बांधणीला गेले होते. भात बांधण्याच्या कामात असताना त्यांना विषारी सापाने दंष केला. लागलीच जवळच्या शेतकऱ्यांनी उपचारासाठी नंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲम्बुलन्स मधून घेऊन गेले. मात्र तेथील डॉक्टरने उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू घोषित केला.
त्यानंतर त्यांचा मृत्यू देह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आला.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा विवाहित मुलगी,वडील असा परिवार आहे.
आज मंगळवारी हत्तरवाड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
त्यांच्या मृत्यूने हतरवाड गावावर शोककळा पसरली आहे.