#तीस विद्यार्थ्यांचा सहभाग!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
तोपिंनकट्टी तालुका खानापूर येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी बेंगलूर येथे जनसेवा विद्या केंद्र यांच्या वतीने नुकताच पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या तीस खेळाडूंनी भाग घेतला होता.
या स्पर्धा दोन विभागात घेण्यात आल्या. यामध्ये स्टेट लेवल तसेच झोनल लेवल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. स्टेट लेवल क्रीडा स्पर्धेत 19 जिल्ह्यांचा समावेश होता तर विजेत्या विजेते खेळाडूंना झोनल लेवल क्रीडा स्पर्धेतील तेलंगणा व आंध्रा यांच्यासोबत खेळ खेळविले जातात. यामधील विजेत्या खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर निवडले जाते.
स्टेट लेवल क्रीडा स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या खेळाडू श्रीलेश पाटील हॅमर थ्रो द्वितीय क्रमांक, . परशुराम वाडकर यांने ट्रिपल जंप मध्ये दुसऱ्या क्रमांक, वैष्णवी पाटील 3000 व तीन किलोमीटर चालणे दुसरा क्रमांक, पटकावून त्यांची झोनल लेवल स्पर्धेत निवड झाली.
मैनेउद्दीन धामणेकर हॅमर थ्रो व थाळीफेक मध्ये तिसरा क्रमांक, अमिना नंदगड तीन किलोमीटर चालणे तिसरा क्रमांक, तर अनिकेत कुंभार याने 800 800 मीटर धावणे 400 मीटर धावणे तृतीय क्रमांक ओंकार गावडे यांनी 200 मीटर धावणे तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
झोनल लेवल स्पर्धेत यश मिळवलेले खेळाडू!
परशुराम गावडे यांने ट्रिपल जंप मध्ये प्रथम क्रमांक, श्रीलेश पाटील यांने हॅमर थ्रो प्रथम क्रमांक, वैष्णवी पाटील हिने 3000 मीटर धावणे व तीन किलोमीटर चालणे द्वितीय क्रमांक, अनिकेत कुंभार व परशुराम वाडकर
यांची ४×४०० रिले निवड झाली.
या चारही खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धा पुढील महिन्यात हसन येते होणार आहेत.
विजय खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक व आमदार विठ्ठलराव हलगेकर सचिव प्रा आर एस पाटील व संचालकांनी अभिनंदन केले. या खेळाडूंना प्राचार्य स्वाती वाळवे व पी आर ओ मनिषा भोसले यांचे सहकार्य लाभत आहे. क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे. विजय खेळाडूंचे खानापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे.
