संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
हुलेकल. ( ता. शिर्शी ) वन अधिकारी शिवानंद निंगानी यांच्या वन विभागात धाडसी सेवेसाठी प्रामाणिक कार्याबद्दल बेंगळूर येथील विधान सौधच्या बॅक्वेट हॉलमध्ये आयोजित 71 व्या वन्य जीवन सप्ताहाच्या समारोप समारंभात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते वनाधिकारी शिवानंद निंगाणी यांचा मुख्यमंत्री पदक देऊन सत्कार करण्यात आला.
वन अधिकारी शिवानंद निंगाणी यांचा परिचय!
वन विभाग हुलकेल ( ता. शिर्शी ) झोनचे झोनल वन अधिकारी म्हणून सन 2016 मध्ये कर्नाटक वन विभाग वनाधिकारी म्हणून निवड झाली. त्यांनी 2016 ते 2018 या काळात कर्नाटक वन अकादमी गुंगारा गट्टी येथे झोनल वन अधिकारी पदाकरिता प्रशिक्षण घेतले.
त्यानंतर शिर्शि तालुक्यात हुनसूर,अनेचौकूर,शिर्शि झोन मध्ये सेवा केली आणि सध्या ते हुलेकल येथे सेवा बजावत आहेत.
एक सेवा दक्ष अधिकारी म्हणून त्यांनी 100 हून अधिक प्रकरणी हाताळले आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक कोटी रुपये किमतीचे 52 सागवान ,किंदळ, मत्ती, प्रकारची लाकडे, दोन लॉरी जप्त केले त्याचबरोबर चार आरोपींना अटक केले. सिद्धापूर परिसरात सेवा बजावताना एका चंदन चोराला दहा वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजाराचा दंड तसेच 80 किलो पेक्षा जास्त चंदन जप्त केले आहे.
काही 24 तासात एका बिबट्या चा मृत्यूचा तपास लावला. जंगलातील अतिक्रमण थांबविणे पाच लाख रुपयाच्या बेकायदेशीर मिळवलेल्या लाकडाची जप्ती आणि इतर वन्य प्राणी प्रकरणे हाताळण्याची कामगिरी केल्याबद्दल मुख्यमंत्री पदाकासाठी निवड करण्यात आली.
या या कार्यक्रमात वनमंत्री ईश्वर खांड्रे, माजी क्रिकेटपटू व वन आणि वन्यजीव राजदूत अनिल कांबळे, विधान परिषद सदस्या ऐवना डिसोझा व इतर मान्यवर उपस्थित होते.
