संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
गर्लगुंजी ( ता. खानापूर) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवार दिनांक ७ रोजी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ.ललिता कोलकार होत्या. यावेळी पीडिओ पार्वती जाधव यांनी प्रास्ताविक करून उपस्थिती स्वागत केले.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ ललिता कोलकार यांच्या हस्ते वाल्मिकींच्या फोटोचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील, परशराम चौगुले, अजित पाटील, सुरेश मेलगे, हणमंत मेलगे,ग्रामपंचायत सदस्या सौ. अनुराधा निटूरकर सेक्रेटरी निंगाप्पा चौगुले, ग्रंथपाल संजय पाटील व ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.
