संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधी
सुगीच्या हंगामात शिवारात सर्प दोषाच्या घटना वारंवार घडत असतात. अशावेळी वेळेत उपचार न झाल्याने अनेकदा सर्पदंशाने जीव गमवावा लागतो. अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीतुन सर्पदंशा वरील इंजेक्शन अथवा औषधाचा पुरवठा करावा. अशी मागणी शिंदोळी (ता खानापूर) ग्रामपंचायतीतचे सदस्य राजेश पाटील यांनी शासनाकडे केली आहे.
खानापूर तालुका हा अति जंगलांनी व्यापलेला आहे. अशा तालुक्यात सर्पदंशाचे प्रकार कायम घडतात. मागासलेल्या तालुक्यात सर्पदंशा नंतर उपचार तातडीने मिळणे कठीण आहे. बेळगाव सारख्या ठिकाणी जाण्यास दोन तासाचा कालावधी लागतो. अशावेळी उपचार उशीर झाल्याने व्यक्ती दगावण्याची शक्यता आहे. तेव्हा
ग्रामपंचायत पातळीवर सर्पदंश इंजेक्शन मिळाल्यास जीव वाचू शकतो. यासाठी ग्रामपंचायत पातळीवर सोय करावी .
अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील यांनी केले आहे.
