संदेश क्रांती न्यूज
खानापूर प्रतिनिधि
नागरगाळी हलशी या महामार्गावरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांतून तसेच प्रवाशातून कमालीची नाराजी पसरली आहे . त्यामुळे या भागातील मेरडा गावचे सामाजिक कार्यकर्ते विष्णू जयवंत पाटील, हलगा ग्रामपंचायतचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते रणजीत कल्लाप्पा पाटील, लक्ष्मण पाटील मेरडा आदींनी सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी खानापूर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन समस्यां मांडली.
या निवेदनाच्या प्रति सार्वजनिक बांधकाम मंत्री, विधानसौध बेंगळूर यांना पाठवून रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे.
निवेदन देताना विष्णू जयवंत पाटील म्हणाले की या महामार्गाच्या परिसरात25 ते 30 गावे आहेत. या रस्त्यावरून अनेक नागरिक, शालेय विद्यार्थ्यांना ,तसेच कॉलेज विद्यार्थी प्रवासी वर्ग रुग्ण नेहमी येजा करतात .या खराब रस्त्यामुळे गेल्या 15 ते 20 वर्षापासून या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे प्रवासांचे हाल होतात याशिवाय खोल खड्ड्यानी अनेक अपघात घडले आहेत. या अपघातामुळे जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला आहे. अजून किती जणांचे जीव घ्यावयाचे आहेत. असा संतप्त सवाल केला.
एवढेच नव्हे तर हलसी हे कदब कालीन पर्यटन स्थळ असून जुनी पुरानी देवस्थाने आहेत. या ठिकाणी येण्यासाठी रस्त्याची दुरावस्था झाल्याने प्रवाशी. वर्गातून नाराजी होते.
तेव्हा येत्या 26 ऑक्टोबर पर्यंत नागरगाळी हलशी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण झाली नाही तर 27 ऑक्टोबर रोजी अकरा वाजता धारवाड रामनगर राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा विष्णू पाटील यांनी दिला आहे.
या आंदोलनाला नागरगाळी, हलशी हत्तरवाड, मेरडा, हलगा किरहलशी करजगी बस्तवाड बाळगूनंद, तावरकट्टी, गोधोळी गोदगेरी, गुंडोळी , बामणकोप, उंबरापाणी, पूर , दांडेली अधिभागातील नागरिक रस्ता रोको आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत.
यावेळी निवेदनाच्या प्रती जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी, माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर, खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी आमदार विठ्ठल हलगेकर एम एस सी चन्नाराज हट्टीहोळी तसेच पोलीस अधिकारी व बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
