#गणेबैलच्या शेतकऱ्याच्या बैलावर गविरेड्याचा हल्ला !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अति जंगलांनी व्यापलेला आहे. या तालुक्यात जंगली प्राण्यांचे हल्ले दिवसांनी वाढत आहेत. गेले कित्येक वर्षापासून अस्वल, बिबट्या, गविरेडे , यासारख्या.हिंस्त्र प्राण्याचे हल्ले कधी माणसावर तर कधी पाळीव प्राण्यावर होतच आहेत.
अशाच प्रकारचा हल्ला खानापूर तालुक्यातील गणेबैल-काटगाळी रोडवरील जंगल भागात असलेल्या शेतवाडीत गविरेड्याने एका बैलावर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. गरीब शेतकऱ्यांला आर्थिक फटका बसला. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नाही.
दुसरीकडे खानापूर तालुक्यातील वन अधिकारी जंगल स्वच्छतेसाठी हवा तेवढा खर्च करून मोकळे होतात. शनिवारी दि. 4 ऑक्टोंबर रोजी भीमगड अभयारण्यातील हे हेमाडगा जंगल परिसरात जंगल स्वच्छते नावा खाली हवा तेवढा पैसा खर्च करून मोकळे झाले.
तशाच प्रकारे गणे बैल गावच्या शेतकऱ्याला आर्थिक मदत करून सहकार्य करावे अशी मागणी होत आहे.
मात्र यासाठी गरीब शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना वन खात्याच्या कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागतात. अद्याप आर्थिक मदत होईल याची माहिती अध्याप देण्यात आली नाही. याची अध्याप शाश्वती सुद्धा नाही.
यासाठी आमदारांनी याकडे लक्ष देऊन गरीब शेतकर्याला आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी गणेबैल परिसरातील पुंडलिक गुरव, रमेश कवठनकर ,मीनाजी गुरव, ज्ञानेश्वर गेजपतकर, मारुती गुरव, नारायण कोलेकर आधी शेतकर्यांनी केली आहे.
