#आत्महत्येचे कारण समजु शकले नाही!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
इदलहोंड ( ता.खानापूर) येथील युवकाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी दि.७ रोजी घडली. सदर युवकाचे नाव दिग्विजय मनोहर जाधव (वय ३५) असुन तो श्री पिसेदेव को आँप.सोसायटीच्या गर्लगुंजी शाखेत क्लार्क म्हणून नोकरीला होता.
गुरूवारी सकाळ पासुन घरात नसल्याचे घरच्या लोकांच्या लक्षात आले.त्यामुळे घरच्या लोकानी शोधाशोध केली.त्यावेळी त्याची दुचाकी स्वताच्या शेतात आढळली त्याचबरोबर विहीरीजवळ त्याचे चप्पल ही दिसुन आले.त्यावरून संशय बळावल्याने लागलीच खानापूर अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशामक दलाच्या जवावानांच्या प्रयत्नाने विहिरीतुन मृतदेह काढण्यास दोन तासानंतर यश आले.त्यानंतर मृत्यूदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर सरकारी दवाखाण्यात पाठविण्यात आला. उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दिग्विजयच्या पश्चात पत्नी ,मुलगा आई ,वडील ,भाऊ ,बहिणी असा परिवार आहे.
घटनेची नोंद खानापूर पोलिस स्थानकात झाली असुन पोलिस पुढील तपास करत आहेत.
मात्र आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजु शकले नाही.
दिग्विजयच्या मृत्यूमुळे इदलहोंड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.