संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
इदलहोंड ( ता.खानापूर) येथील युवकाचा शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने र्दूदैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दि.७ रोजी घडली. सदर युवकाचे नाव दिग्विजय मनोहर जाधव (वय ३५) असुन तो श्री पिसेदेव को आँप.सोसायटीच्या गर्लगुंजी शाखेत क्लार्क म्हणून नोकरीला होता.
गुरूवारी सकाळ पासुन घरात नसल्याचे घरच्या लोकांनी शोधाशोध केली .यावेळी त्याची दुचाकी स्वताच्या शेतात आढळली त्याचबरोबर विहीरीजवळ त्याचे चप्पल ही दिसुन आले.त्यावरून त्याचा पाय घसरून पडल्याचा अंदाज आल्याने लागलीच खानापूर अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले.
अग्निशामक दलाच्या जवावानांच्या प्रयत्नाने विहिरीतुन मृतदेह काढण्यास दोन तासानंतर यश आले.त्यानंतर मृत्यूदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर सरकारी दवाखाण्यात पाठविण्यात आला. उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दिग्विजयच्या पश्चात पत्नी ,मुलगा आई ,वडील ,भाऊ ,बहिणी असा परिवार आहे.
घटनेची नोंद खानापूर पोलिस स्थानकात झाली असुन पोलिस पुढील तपास करत आहेत.
दिग्विजयच्या मृत्यूमुळे इदलहोंड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.