“# बरगाव क्लस्टर लेवल क्रिडास्पर्धाचे आयोजन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
अभ्यासाबरोबर खेळाला ही महत्व आहे.विद्यार्थ्यानी खेळात चांगली कामगारी करून राष्ट्राचे नाव उज्वल करावे. असे मत खानापूर तालुका भाजपचे माजी अध्यक्ष संजय कुबल यानी बरंगाव क्लस्टर लेवल क्रिडास्पर्धा उदघानच्यावेळी बोलताना व्यक्त केले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊराव पाटील (पंच कमिटी सदस्य) कुप्पटगिरी उपस्थित होते.
यावेळी दिपप्रज्वलन प्रमोद कोचेरी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, सदानंद पाटील एम डी लैला शुगर, प्रमोद कोचेरी (भाजप जिल्हा उपाध्यक्ष), बसवराज सान्निकोप तालुका अध्यक्ष आदीच्या हस्ते करण्यात आले.
विविध फोटोचे पुजन पद्मश्री पाटील सदस्य , संजय कुबल भाजप माजी तालुका अध्यक्ष भाऊ पाटील सदस्य,मदन पाटील माजी सदस्य, यांच्याहस्ते करण्यात
यावेळी ध्वजारोहन व क्रिडाज्योत प्रज्वलन सौ ज्योती कदम सी आर पी बरगांव, इतर मान्यवराच्याहस्ते करण्यात आले.
क्रिडासाहित्याचे पुजन ग्राम पंचायत सदस्य पद्मश्री पाटील कल्लापा पाटील ,गोविंद किरमिटे, इतर मान्यवराच्याहस्ते करण्यात आले
क्रीडास्पर्धाचे उदघाटन लैला शुगरचे एम.डी. सदानंद पाटील यानी गोळा फेक फेकुन केेले.
यावेळी प्रमोद कोचेरी,विश्वास किरमिटे ,पद्मश्री पाटील,महांतेश पाटील,भाऊराव पाटील याची भाषणे झाली. कार्यक्रमाचे औचित्य साधुन कुप्पटगिरी पंचकमिटीचा सत्कार करण्यात आला
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बरगांव ग्रा.प. अध्यक्षा सौ.चागुणा पाटील, महांतेश पाटील ग्रा पं. सदस्य ,सदस्या सौ.गोपिका मुतगेकर,गौरा मादार, एसडीएमसी अध्यक्ष मोहन देवलतकर,दोड्डहोसुर, सातेरी सुंडकर हत्तरगुंजी,मारूती लोकोळकर बरगांव याजबरोबर गजानन पाटील,सखाराम पाटील,ओमान कुंभार,मारूती मुतगेकर,शंकर गुरव ,लक्ष्मण पाटील,विष्णू कुंभार,परशराम अल्लोळकर आदी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विविध शाळांचे मुख्याध्यापक ,कुप्पटगिरी पंच कमिटी,शाळा व्यवस्थापन कमिटी इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक डी.वाय. देसाई यांनी केले. सुत्रसंचालन एन जी जोगोजी यानी केले.तर आभार श्री पाटील यानी मानले.