#नागरीकांच्या मदतीने रस्ता केला मोकळा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात वादळ व मुसळधार पावसामुळे महामार्गावर झाडे कोसळण्याचे प्रकार नेहमीच सुरू असतात.अशाच प्रकारे रविवारी दि २७ रोजी पहाटेच्या वेळी
हेम्माडगा(खानापूर) मार्गावरील शिरोली बसस्थानकाजवळ जांबळीचे भले मोठे झाड कोसळुन दोन तास वाहतुक ठप्प झाली.
लागलीच शिरोली भागातील नागरीकानी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर पडलेल्या झाडाच्या फांद्या तोडुन रस्ता वहातुकीस मोकळा केला.
यावेळी सामाज सेवक नारायण काटगाळकर यानी घटना स्थळी धाव मदत केली व बोलताना म्हणाले की ,या मार्गावर अनेक झाडे वाळलेली आहेत. याभागात नेहमीच जोरदार वारा,पाऊस पडत असतो.तेव्हा अशी झाडे केव्हा ही कोसळण्याची भिती असते. तेव्हा संबधीत वनखात्याला याची जानीव करून देणार तसेच या रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ता खराब झाला आहे.त्यामुळे खड्डे पडुन वाहनाधारकाना अनेक ठिकाणी धोका पत्करावा लागतो. यासाठी संबधीत खात्याच्या अधिकार्याची भेट पॅचवर्क करण्यासाठी सुचना करणार असल्याचे सांगीतले. यावेळी शिरोली भागाचे दत्ता राऊत ,नारायण काटगाळकर गावचे नागरीक उपस्थित होते.