#बैलूर रस्त्याच्या दुरूस्थीची पाहणी करताना नागरीक!
खानापूर प्रतिनिधी :
खानापूर प्रतिनिधी
बैलूर ( ता.खानापूर ) रस्त्याची यंदाच्या पावसात झालेली दैयनिय आवस्था होऊन रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. याखड्ड्यांचा बैलूर ग्रामस्थाना, विद्यार्थ्याना दररोज त्रास सहन करावा लागत होता. म्हणून बैलुर ग्रामस्थानी सोमवारी दि २८ रोजी रास्तारोकोचा इशारा दिला होता.
याची दखल घेऊन संबधीत खात्याच्या कंत्राटदाराने घेऊन रविवारी दि २७ रोजी बैलुर रस्त्याच्या दुरूस्तीची सुरूवात केली.
मात्र रविवारी कंत्राटदाराने सुरू केलेल्या
रस्त्याची दुरुस्ती चांगली होत नसून मध्ये पडलेले खड्डे व्यवस्थित भरण्यात यावेत याबद्दल ठेकेदाराला सुचना करण्यात आल्या. ठेकेदाराने येत्या दोन चार दिवसांत रस्ता तात्पुरता प्रवासाला योग्य करण्याचे आश्वासन दिले. अधिकारी वर्गाबरोबर चर्चा करून येणाऱ्या काळात रस्ता योग्य पध्दतीने करण्याचेही खात्री दिली. जर ठेकेदार व अधिकारी वर्गाने रस्ता करण्यास दिरंगाई किंवा कांही अडचणी निर्माण केल्यास मग कुठल्याही प्रकारचा दबाव न खपवून घेता संपूर्ण ग्रामस्थ व विद्यार्थी वर्गाच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे उद्याचा सोमवारी होणारा रास्तारोको आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे.
यावेळी भरमू गुरव, विठ्ठल राजगोळकर,दामोदर नाकाडी,सी एम पाटील रामचंद्र हलगेकर,सोमान्ना नाकाडी रस्ता दुरूस्तीच्यावेळी उपस्थित होते.