#आम. विठ्ठलराव हलगेकर यांच्या प्रयत्नाने १० कोटी रू.खानापूर तालुक्यात मंजुर!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात नाबार्ड योजनेंतर्गत १० कोटी रूपयांचे अनुदान पुल बांधकम प्रकल्पासाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या प्रयत्नाने मंजुर झाले .
यासाठी कोणत्याही गावात पुल बांधण्याची आवश्यकता असल्यास जागांचा सविस्तर प्रस्ताव आणि कृती आखाडा तयार करून तो मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
नाबार्डकडुन आर्थिक सहाय्य घेऊन रचनात्मक कामांतर्गत पुल बांधणीच कामे हाती घेण्यात येणार आहे.
तेव्हा असोगा कांजळ रस्त्यावर नाबार्ड योजनेंर्तगत पुल उभारण्यात यावा.तेव्हा आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी गेल्या कित्येक वर्षापासुन असोगा कांजळे रस्त्यावर नाबार्ड योजनेंतर्ग पुल उभारून असोगा कांजळे परीसरातील जनतेची सोय करावी.
अशी मागणी खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष व निलावडे ग्राम पंचायतीचे सदस्य विनायक मुतगेकर यानी केली आहे.