#सिध्दकला इंग्रजी शाळेचा बस चालक कल्लाप्पा कुप्पटगेरी(यडोगा) याना इंजिनिअर आर.आर.कुलम यांचा मोबाईल सापडला!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर शहरातील पारिश्वाड खानापूर रोडवरील बसस्थानका समोर खानापूर तालुका इंजिनिअर असोसिशनचे चेअरमन व लैला साखर कारखाण्याचे निवृत्त सिव्हील इंजिनिअर आर आर कुलम याचा चांगल्या किमतीचा मोबाल शनिवारी दुपारी दुचाकीवरून जाताना रस्त्यावर पडला. याची कल्पना आर.आर.कुलम याना आली नाही.
त्याच रोडवरून मराठा मंडळ संस्थेच्या सिध्दिविनायक इंग्रजी स्कूलची बस जात होती. यावेळी बसचालक कल्लाप्पा नागाप्पा कुप्पटगिरी ( रा.यडोगा) याना धावत्या बसमधुन मोबाईल दिसला. लागलीच बस थांबविली. व रस्त्यावर पडलेला मोबाईल घेतला .अन्यथा मोबाईलवरून बस गेली असती.
लागली मोबाईल मधील नंबर राजू गावडे यांच्याशी संपर्क साधला. व घडलेली माहिती दिली. राजू गावडे यानी खानापूर तालुका इंजिनिअर असोसिएशनचे चेअरमन व लैला सुगरचे निवृत्त सिव्हील इंजिनिअर आर आर कुलम यांचा मोबाईल आहे असे सागुन ेसंपर्क करून बस चालक कल्लापा कुप्पटगेरी यानी मोबाईल सुपूर्त केला.यावेळी आर आर कुलम यानी बक्षिस म्हणून काही रक्कम देऊ केली .मात्र त्यानी ती स्विकारली नाही.तुमचा आशिर्वाद हेच मला बक्षिस आहे .
असा प्रामाणिकपणा सिध्दकला इंग्रजी शाळेचा बसचालक कल्लापा कुप्पटगेरी यानी दाखवुन दिला. त्याबद्दल त्याच्या प्रामाणिकपणाचे तालुक्यातुन कौतुक होत आहे. जवळपास ५० हजार रूपये किमतीचा मोबाईल होता.