#कुलगुरू डाॅ.एस विद्याशंकर यांच्या हस्ते शुभारंभ!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
तोपिनकट्टी ( ता .खानापूर ) येथील श्रीमहालक्षमी ग्रुप संचालित शांतिनिकेतन एज्यूकेशन सोसायटीच्यावतीने बी सी ए व बी बी ए अभ्यासक्रमांचा शुभारंभ शनिवारी शांतिनिकेतन महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार व संस्थच चेअरमन विठ्ठलराव हलगेकर होते.
तर प्रमुख वक्ते म्हणून कुलगुरू डाॅ.एस विद्याशंकर ,विश्वेश्वरय्या टेक्नाॅलाॅजिकल युनिर्व्हसिटी बेळगांव उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रा.बंडू एल.मजुकर चेअरमन शांतिनिकेतन पदवी महाविद्यालय संचालक, प्रा.भरत एम.तोपिनकट्टी उपाध्यक्ष श्री महालक्ष्मी ग्रुप एज्यूकेशन सोसायटी तोपिनकट्टी,शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर , सचिव प्रा.आर.एस.पाटील ,जाईट डायरेक्टर महादेव बांदेवडीकर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रजवलन व फोटो पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
प्रारंभी पीआरओ प्रा.मनिषा भोसले यानी स्वागत करून प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला.
यावेळी बोलताना विश्वेश्वरय्या टेक्नाॅलाॅजीकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डाॅ.एस.विद्याशंकर यानी बी बी ए व बी सी ए विद्यार्थ्याना कठोर परिश्रम व नविन शोधात्मक अभ्यासाकडे लक्ष सध्याचे युग वैज्ञानिक आहे.नविन शोध घेण्याकडे वळा जीवनात नक्कीच यशस्वि व्हाल.असे मार्गदर्शन केेेले.
यावेळी आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी खानापूर तालुक्यातील विद्यार्थ्याना बी बी ए तसेच बी सी ए अभ्यासक्रमा साठी बाहेर जाऊन शिक्षण घ्यावे लागत आहे. तालुक्यातील विद्यार्थ्याची आडचण व योग्य शिक्षण मिळावे.या उद्देशाने बी बी ए व बी सी ए शिक्षणाची सोय केली आहे.त्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन केले.
कार्यक्रमाला संचालक विठ्ठल करंबळकर ,चांगाप्पा निलजकर,यल्लापा तिरविर, नारायण हलगेकर, नागेश जोगोजी, अनिल कदम राजाराम हलगेकर, बाळासाहेब देवलतकर, बी एम पाखरे, आदी मान्यवर तसेच विद्यार्थी, पालक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
शेवटी आभार प्रा.नंदा कोठेकर यानी मानले.