#प्रथम भाजपच्या समाज सेवकानी खड्डा बुजविला! चिखल होताच पीडब्लूडी खात्याने काळी खडी टाकून दुरूस्त केला!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर पारिश्वाड रोडवरील पडलेला खड्डा प्रवाशाना त्रासाचा होत होता. यासाठी आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी पीडब्लूडी खात्याच्या अधिकार्याना तातडीने पारिश्वाड क्राॅसवरील खड्डा बुजविण्याची सक्त ताकिद दिली होती.
परंतु भाजपच्या कार्यकर्त्यानी तसेच सामाज सेवेकानी घिसाड घाई करून बुधवारी दि .९ रोजी माती टाकुन पडलेला खड्डा बुजण्याचा प्रयत्न केला. परंतु मातीमुळे खड्डयात चिखल होऊन प्रवासाना चिखलाचा त्रास होत होता.
तर गुरूवारी दि १० रोजी आमदार विठ्ठलराव हलगेकर यानी लागलीच पीडब्लूडी खात्याच्या अधिकार्याना खड्ड्यातील चिखल बाहेर काढुन त्याठिकाणी काळी खडी व काळा मोरम टाकून रस्ता वाहतुकीस योग्य करण्यास सुचना बेगलुर येथूनच केली .
त्यामुळे गुरूवारी पारिश्वाड क्राॅस खड्डा बुजवुन वाहतुकीस योग्य केला. आमदार विठ्ठलराव हलगेकर हे बेंगलोर येथे असुन जातीने खड्डा बुजविला आहे.
तर भाजपच्या कार्यकर्त्यानी व सामाज सेवकानी घातलेली माती पीडब्लूडी खात्याच्या अधिकार्यानी बाहेर टाकून त्या ठिकाणी काळी खड्डी व काळी मोरम टाकून खड्डा बुजवुण रस्ता वाहतुकीस योग्य केला आहे.