#हस्ती दंताचे ७ तुकडे जप्त!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गस्टोळी ( ता. खानापूर ) गावच्या क्राॅसजवळ हस्तीदंत विक्री करणार्या तिघाना सापळा रचून पकडण्यात आले.व त्यांच्याजवळ असलेेले सात हस्ती दंताचे तुकडे ही जप्त करण्यात आले .
याबाबत जिल्हा सीईएन गुन्हे पोलिस ठाण्यात डब्ल्यू एल ओ आर क्रमांकासह ०१-२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ.भीमाशंकर गुळेद व बेळगाव जिल्हा सी ई एन पोलिस ठाण्याचे डीवायएसपी विरेश दोड्डमणी ,व पी आय सुनील कुमार नंदीश्वर ,यांच्या मार्गदर्शनाखाली पी एसआय आनंद क्यारकट्टी,पी एस आय अशोक बजंत्री,मुख्य हवालदार जयराम हम्मण्णावर ,टी.के कोळची,लक्कपा किरलगी , घडेप्पानावर,यानी ही कारवाई केली.
यावेळी संजय गवाळकर सीतवाडा (ता .जोयडा),जाफर गुंडोळी व बसवराज उर्फ अभिषेक वड्डर भुरूनकी याना अटक केली आहे.
आरोपीना न्यायालयात हजर करण्यात आले असुन बेळगाव जिल्हा सी ई एन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.