#कुसमळी पुल अवजड वाहतुकीला बंदी!.
अनमोड घाटात मार्गावर भेगा पडुन दरड #कोसाळली !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील कुसमळी जवळील मलप्रभा नदीवरील नव्या बांधण्यात आलेल्या फुलावरून अवजड वाहतुकीला निर्बध घातले आहेत. त्यामुळे बेळगाव खानापूर मार्गे गोव्याला जाणार्या अवजड वाहतुकीला बंदी घालण्या आली आहे.त्यामुळे चोर्ला मार्गे गोव्याला जाणारी अवजड वाहतुक ठप्प झाली आहे.
तर गोव्याला जाणार दुसरा मार्ग म्हणजे अनमोड मार्गे होय. परंतु अनमोड घाटात महामार्गावर भेगा पडल्या असुन सध्या दरड कोसळली आहे.त्यामुळे यामार्गावरून ही अवजड वाहने जाणे धोक्याचे झाले आहे.
रामनगर अनमोड रस्ता !
रामनगर अनमोड महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने त्यातच प्रवाशाची वर्दळ असतानाच आता महामार्गावर चक्क भेगा पडल्या आहेत. आता दरड कोसळली आहे. त्यामुळे वहातुक पूर्णपणे धोक्याची आहे दुधसागर वळणाच्या अलिकडे रस्त्यावर भेगा पडुन दरड कोसळत आहे .