संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक उद्या शुक्रवार दि.२७ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे बोलावण्यात आलेली आहे.
तरी खानापूर तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी दुपारी दोन वाजता हजर रहावे असे आवाहन खानापूर तालुका म ए समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील व निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी आदीनी कळविले आहे.