स्थळ : वनमाला सभागृह!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर लायन्स क्लबच्या नविन पदाधिकार्यांचा अधिकारग्हण सोहळा व क्लबचा ५३ वा स्थापना दिन असा कार्यक्रम सोहळा आज शुक्रवारी दि २७ रोजी सायंकाळी ७ वाजता वनमाला सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
क्लबचे माजी जिल्हा प्रांतपाल श्रीकांत मोरे या कार्य क्रमाचे अमलबजावणी अधिकारी म्हणून सहभागी होणार आहेत. तर क्लबचे नवे अध्यक्ष म्हणून विकास कल्याणी तसेच सचिव म्हणून विनय हिरेमठ, आणि खजिनदार म्हणून भाऊ चव्हाण याची नियुक्ती होणार आहे.
यावेळी क्लबचे विद्यामान अध्यक्ष रविसागर उप्पीन तसेच सदस्य जी एम कुमार,अजित पाटील , ब्रह्मानंद कोचेरी ,डाॅ.राधाकृषण हारवाडेकर,एम जी बेनकट्टी, के .एम. घाडी,ज्यूनेद तोपिनकट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.