संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कणकुंबी ( ता.खानापूर) विभागाचे पत्रकार व माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल चिगुळकर यांच्या मातोश्री व कालमणी गावच्या रहिवाशी श्रीमती इंदिरा गणपती चिगुळकर (वय.८५) यांचे गुरूवारी दि.२६ रोजी वृध्दपकालीन निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन कर्ते चिरंजीव ,एक विवाहित मुलगी, सुना ,जावई नातवंडे,पणतवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्यविधी उद्या शुक्रवारी दि २७ रोजी सकाळी ११ वाजता कालमणी येथे होणार आहे.
बी ई ओ कार्यालयाचे निवृत्त क्लार्क आर. जी .चिगुळकर यांच्या त्या मातोश्री होत.