#लोकप्रतिनिधी लक्ष देने गरजेचे”!

संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात गेल्या चार दिवसापासुन दमदार पावसाची हजेरी लावल्याने शेतकरी पेरणीपूर्व मशागतीच्या कामाना लागले आहेत.
मात्र खानापूर तालुक्यात कृषी खात्याकडुन भात बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकरीवर्गातुन चिंतेचे सावट पसरले आहे.तेव्हा लोकप्रतिनीधीनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. व बियाणाचा पुरवठा सुरळीत होईल यासाठी प्रयत्न करने महत्वाचे आहे.
खानापूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी कृषी खात्याकडुन मिळणार्या भात बियाणावर अवलंबुन असतात.मात्र याकडे लोकप्रतिनिधी चे साफ दुर्लक्ष होत आहे.
सध्या खानापूर तालुक्यात शेतकरी पेरणीपूर्व तयारीत मग्न आहेत. परंतु भात बियाणाचा पत्ता नाही.परंतु तालुक्याच्या काही भागात शेतकरी दरवर्षी मे महिण्याच्या दुसर्या आठवठ्यात पाणथळ जमीनीतील भात पेरणी पूर्ण करतात.परंतु यंदा अद्याप भात बियाणे उपलब्ध नसल्याने पेरणी खोळंबली आहे.याला जबाबदार कोण?.
सध्या खानापूर तालुक्यातील शेतकरी पेरणीसाठी सज्ज असलेतरी भात बियाणाचा पुरवठा कसा होणार याकडे शेतकर्याचे लक्ष लागुन आहे.
कृषिकेंद्रित भात बियाणेचा पुरवठा करा!
खानापूर तालुक्यातील खानापूर गुंजी, जांबोटी, बीडी, कक्केरी ,हिरेमन्नोळी येथील कृषी केंद्रात भात बियाणेचा पुरवठा लवकरात लवकर उपलब्ध करावा.अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.