#मलप्रभा नदीघाटावर कार्यक्रम संपन्न
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्याला भाजपचा पहिला आमदार होण्याचा मान कै.माजी आमदार प्रल्हाद रेमाणी याना मिळाला.
त्याच्या राजकरणाची सुरूवाता ही खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने हेब्बाळ तालुका पंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड आणण्याने झाली. परंतु केवळ दोन महिने सेवा बजावुन आपल्या तालुका पंचायत सदस्य पदाचा राजीनाम देऊन.त्यावेळी भाजप पक्षात प्रवेश केला.
त्यावेळी त्याची खानापूर तालुका भाजप तालुका अध्यक्ष पदी निवड झाली.
तेव्हा पासुन भाजप पक्षाला बळकटी आली.
तालुक्यात भाजप पक्ष करण्यासाठी यानी आपले प्रयत्न सुरू केले. व सन १९९९ ते २००४ मध्ये विधानसभा निवडणुक लढविली.मात्र निकटता पराभव पत्करावा लागला. परंतु पराभावामुळे खचुन न जाता , पुन्हा जोमाने कामाला लागले.व पुन्हा २००८ साल ची विधान सभा निवडणुकीत त्याना पुन्हा भाजप पक्षाची उमेदवारी देण्यात आली. ही निवडणुक लढवून त्यानी विजय संपादन केला.व खानापूर तालुक्याचा भाजपचा पहिला आमदार होण्याचा मान मिळविला.खानापूर तालुक्यात इतिहास घडविला.जवळापास ४०० कोटीची विकास कामे करून तालुक्याचा विकास घडविला.
राज्यात भाजप पक्षाचे सरकार असल्याने सत्तेचा पुरे पूर लाभ उठवत त्यानी खानापूर तालुक्याचा सर्वागीन विकासासाठी प्रयत्न केले.
खानापूर तालुक्याच्या विविध भागातील रस्ते, पुल , पाणी तसेच योजना मार्गी लावल्या.तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्याची समस्या सुटावी, यासाठी त्यानी विशेष प्रयत्न केले.
खानापूर शहरातील मलप्रभा नदी वर नगरोत्थान योजना तुन भव्य घाटाची निर्मिती केली. त्यांच्याच प्रयत्नातुन धारवाड़ -गोवा राज्य मार्ग विकासाचा प्रश्न ही मार्गी लावला.खानापूर शहरात मलप्रभा क्रिडांगण,मिनी विधानसौध , असो गा गावचा मलप्रभा नदीवरील पुल, याज बरोबर अनेक महत्वकांक्षी विकासकामे त्यानी मार्गी लावली.
खानापूर तालुक्यातील बंद पडलेल्या भाग्यलक्ष्मी साखर कारखाण्याचे खाजगीकरण करून तो पूर्ववत सुरू केला.शैक्षणिक क्षेत्रात प्रगती साधली.
खानापूर तालुका जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकीत भाजपला विजयी करण्यात कै.माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांचा सिंहाचा वाटा होता.
त्यामुळेच कै.माजी आमदार प्रल्हाद रेमाणी याची आठवण खानापूर तालुक्यातील नागरीकांच्या स्मरणात चिरकाल ठेवणारी आहे.
अशा प्रयत्नवादी पुरूषाचे सन २०१८ साली अल्पशा आजाराने निधन झाले.
आज शुक्रवारी दि.२३ रोजी भाजपच्या वतीने तसेच रेमाणी कुटूंबाच्यावतीने
मलप्रभा नदी घाटावर ८ व्या.पुण्य स्मरण निमित्त आंदरांजली वाहण्यात आली.
या वेळी .माजी आमदार कै.प्रल्हाद रेमाणी याच्या प्रतिमेचे पुजन माजी जि.प.सदस्य व भाजप नेते जोतिबा रेमाणी यानी केले.
तर माजी आमदार व डीसीसी बॅक संचालक अरविंद पाटील,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी,मा जी अध्यक्ष संजय कुबल,अँड. चेतन मणेरीकर, एम डी सदानंद पाटील, माजी सभापती सयाजी पाटील, नगर सेवक आपय्या कोडोळी,पत्रकार विवेक गिरी, वसंत देसाई,मा जी सभापती लक्ष्मण बामणे, मारुती पाटील,सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, बाबा देसाई,प्रकाश गावडे,मा जी ता.प.,सदस्य अशोक देसाई,देवानंद घाडी,सतीश पाटील, प्रभाकर पाटील,जोतिबा अल्लोळकर,शंकर बस्तावडकर,चांगापा निलजकर,रवी पाटील आ दी नी आदरांजली वाहिली.
