#मान येथील नाट्यप्रयोगाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
काॅग्रेस पक्षाला १४० वर्षाचा इतिहास आहे.कांँग्रेस पक्ष हा नेहमी सर्वसामान्य अशा जनतेशी महात्मा गांधी यांच्या विचार प्रमाणे वाटचाल करणारा पक्ष आहे.त्यामुळेच समाजातील दीन दुबळ्या,१८ पगड जातीतील माळी, कोळी, गोंधळी,पारधी अशा अनेक जातीवर्गाबरोबर घेऊन वाटचाल करणारा पक्ष आहे.म्हणून काॅग्रैस पक्ष हा महात्मा गांधी व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीचा पक्ष आहे.असे विचार खानापूर तालुका ब्लाॅक क्राँगेस अध्यक्ष व वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. ईश्वर घाडी यानी मान (ता.खानापूर ) येथे गणेश जयंती निमित्त आयोजित सिंह गर्जना नाट्य प्रयोगाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे पंच सदानंद गावडे होते.
या वेळी बोलताना ते पुढे म्हणाले की,सन २०१८ साली डाॅ.अंजली निंबाळकर यांच्या विजयाची नांदी मान गावातुन घडली.मान गा वा सह परिसरातील गावच्या समस्या सोडविण्यासाठी काॅग्रेसपक्ष त्याच्या पाठाशी उभा राहिल.असे सांगुन ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यानी पंचहमी योजनेसाठी ६० हजार कोटीच्या बजेट मधुन सर्व तळागापर्यतच्या जनेतला हात बार लावला आहे. काँग्रेस पक्ष स्त्री सबलीकरणासाठी पुढे आहे.
या वेळी व्यासपिठावर ग्राम पंचायत अध्यक्ष भिकाजी गावडे, दत्ता गावडे, भाजपच्या नेत्या सौ.धनश्री सरदेसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, वासुदेव चौगुले ,सदानंद पाटील, संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार संजय गावकर यानी मानले.

