शनिवारी महाप्रसादाने #सोहळ्याची सांगता!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
गावात भक्तीने शांतता,सुख समाधान राहते.म्हणून जटगे गावात गेल्या शेकडो वर्षापासुन श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याची परंपरा आज तागायत सुरू आहे.
त्यामुळे वारकर्यानी मोठ्या भक्ती भावाने हा उत्साह साजरा करतात. वारकरी आहेत त्यामुळे गावातील नव्यापिढीतील युवक व्यसनापासुन लांब आहेत.छत्रपती शिवाजी महाराज, शाहु छत्रपती,डाँ.बाबासाहेब आंबेडकर यानी सर्व जाती धर्मापलिकडे जाऊन “विश्वच माझी घर” याभावनेेने अदभुतपूर्व कार्य केले.असे विचार वकिल संघटनेचे अध्यक्ष व खानापूर ब्लाॅक काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी शनिवारी दि.,२४ रोजी जटगे (ता. खानापूर ) येथील पाराय़ण सोहळ्याच्या सांगता समारंभाच्यावेळी बोलताना व्यक्त केले.
या वेळी हभप विश्वनाथ देसाई, हभप .रामचंद्र कोलेकर, प्रवीण सुळकर आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यानी पंचहमी योजनेसाठी ६० हजार कोटी रूपयाच्या बजेट मधुन सर्व दीनदुबळ्या, तळागाळापर्यतच्या महिलाना गृहलक्ष्मी योजनेतुन मदत केली.एवढेच नव्हे तर काॅग्रेस पक्ष स्त्री सबलीकरणासाठी पुढे आहे. खानापूर तालुक्यातील ७७ हजार महिलाना गृहलक्ष्मीचा लाभ मिळाला आहे.असे सांगुन अँड.ईश्वर घाडी म्हणाले की जटगे गावातील पाणी,शाळा,वीज या समस्या दुर करण्यासाठी काॅग्रेस पक्ष नेहमीच आ ग्रे सर आहे.कांग्रेस पक्षाच्या माजी आमदार व आय सीसी सचिव डाॅ.अंजली निंबाळकर या सतत खानापूर तालु क्या च्या विकासासाठी धडपडत असतात, तेव्हा जटगे ते हलसाल यारस्त्याच्या कामासाठी १ कोटी ९० लाख रूपये मंजुर झालेल्या रस्त्याची कामाला वनखात्याची अडचन आहे.यासाठी आमचे प्रयत्न सुरू लवकरच या रस्त्याची आडचन दुर करणार आहे .
या वेळी रस्त्याची पाहणी केली.
प्रारंभी श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्यात सहभागी होऊन फोटो पूजन केले.व पारायण सोहऴ्याला १००१ रूपयाची देणगी देव केली.
या वेळी ग्राम पंचायत सदस्य सागर पाटील यानी अँड.ईश्वर घाडी यांनाचा शाल, पुष्पहार घालुन सत्कार केला.

