
तालुक्यात ८० टक्के मराठी भाषिक २० टक्के कन्नड भाषिक .
तरी ही तालुका भाजप अध्यक्ष पद कन्नड भाषिकालाच!
खानापूर भाजप तालुका अध्यक्षपदी बसवराज सानिकोप!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका मराठी भाषिक तालुका आहे.खानापूर तालुक्यात जवळपास ८० टक्के जनता मराठी भाषिक आहेत.तर केवळ २० टक्के जनता कन्नड भाषिक आहेत.
असे असताना खानापूर तालुक्यात भाजपचे बी मुळ मराठी भाषिकानी रोवले आज त्याचा वृक्ष झाला.त्याच मराठी भाषिक भाजपाना अध्यक्षपद मिळाले नाही.
मागील विधान सभा निवडणुकीत तालुक्यात मराठी भाषिकानी जास्तीत जास्त मतदान करून ९२ हजार मताचा पल्ला गाठण्यास पुढाकार घेतला.त्यामुळे खानापूर तालुक्यात भाजपचा इतिहास घडला .
तालुक्यातील म ए समितीच्या मराठी भाषिक अनेक नेत्यानी , कार्यकर्त्यानी भाजपला बळकटी दिली. अखेर खानापूर तालुक्यात भाजप मराठी भाषिकाना तालुका भाजप अध्यक्षपद डावले.याची खंत तालुक्यातील भाजपच्या नेत्यासह कार्यकर्त्यातुन न कळत दिसुन आली.
भाजप मधील घाडोमाडी!
भाजपचे आमदार कार्यालय !
खानापूर तालुक्याचे भाजपचे आमदार कार्यालय उदघाटन करून खानापूर शहरात आता पर्यत सरकारी इमारतीत कार्यालय झालेच नाही.
शहरापासुन दुर असलेल्या कुप्पटगीरी क्राॅस वरील शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खासगी इमारतीत करण्यात आले .आज दीड वर्ष तालुक्यातील नागरीकाना शहरापासुन दुर असलेल्या शा़तिनिकेतन पब्लिक स्कूल कडे वेळ ,पैसा खर्च करून आमदाराच्या भेटीसाठी येजा करावी लागते.
आमदाराच्या पी.ए.बद्दल ही नाराजी!
खानापूर तालुका मराठी भाषिक तालुका असुन आमदाराना निवडुण आणण्यासाठी मराठी भाषिकानी प्रयत्न केले.मात्र मराठी भाषिकासाठी मराठी भाषा जाणणारा पी.ए ठेवण्यास आमदाराचे साफ दुर्लक्ष झाले आहे.
त्यामुळे मराठी भाषिकांची गोंची होत आहे.याचा विसर पडलेला दिसतो.
आता भाजप तालुका अध्यक्ष सुध्दा कन्नड भाषिकच !
नुकताच खानापूर तालुका भाजप तालुका अध्यक्ष पदाची निवड झाली.तालुक्यात ८०टक्के मराठी भाषिक भाजप नेते,कार्यकर्ते असुन सुध्दा अध्यक्षपदासाठी मराठी भाषिक नेत्याना डावलून ज्याना मराठीचा गंध नसलेल्या व्यक्तीला खानापूर तालुका भाजप अध्यक्ष पद देण्यात आले आहे. हा एक मराठी भाषिकावर अन्यायच आहे.
भाजप मध्ये नाराजी ! याचा लाभ काॅग्रेसला!
खानापूर तालुक्यात भाजपमध्ये अनेक घाडामोडीमुळे नेते , कार्यकर्ते नाराज होत आहेत.त्यामुळे ते पक्षापासुन दुर होत आहेत.
जर असाच प्रकार भाजपमध्ये घडत गेला तर भाजपचे नेते काॅग्रेस पक्षाकडे वळण्यास विलंब लागणार नाही. भाजपमध्ये दुफळी पडली.तर काॅग्रेसला याचा नक्कीच फायदा होणार आणि भविष्यात पुन्हा एकदा खानापूरात काॅग्रेसचाच आमदार होणार यात शंका नाही.