#दोन सत्रात होणार कार्यक्रम!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खैरवाड (ता.खानापूर ) येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या सन १९९७-९८ सालाच्या इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा आज शनिवारी दि.१४ जून रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
खैरवाड येथील प्राथमिक मराठी शाळेच्या पटांगणावर होणारा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा दोन सत्रात होणार आहे.
पहिल्या सत्रात स्नेह मेळाव्याचे उदघाटन, आजी माजी शिक्षकांचा सत्कार ,विद्यार्थ्याचा सत्कार व वक्त्यांचे मनोगत.
दुसर्या सत्रात माजी विद्यार्थ्याचा वर्ग, जुन्या आठवणीना उजाळा त्याचबरोबर इतर कार्यक्रम होणार आहेत.
तरी कार्यक्रमाला आजी माजी विद्यार्थी ,शिक्षकवर्ग,तसेच शिक्षकप्रेमी ,पालक वर्ग नागरीक तसेच तालुक्यातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी विद्यार्थी १९९७-९८ ची बॅच व एसडीएमसी समिती. मुख्याध्यापक व शिक्षकवर्गाच्या वतीने करण्यात आले आहे.