#अवजड ट्रक वाहन रस्त्यात आडकुन वाहतुक ठप्प!
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका हा अति पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे मुसळधार पावसामुळे रस्त्याची दैयनिय होत
आहे.
तालुक्यातील खानापूर जांबोटी रस्त्यावर अवजड ट्रक वाहन रस्त्याच्या बाजुला जमिनीत रूतल्याने खानापूर जांबोटी रस्ता वाहतुकीला ठप्प झाला.
#गाव्याला जाणारे अनेक मार्ग ठप्प झाले!
खानापूर हुन गोव्याला जाणारा कुसमळी चोर्ला रस्ता, खााापूर अनमोड गोवा रस्ता, खानापूर यल्लापूर कारवार गोवा रस्ता सर्वच रस्ते ठप्प झाले.त्यामुळे खानापूर जांबोटी रस्त्यावर अवजड वाहनाची वर्दळ वाढली आहे.त्यामुळे अवजड वाहने रस्त्यात रूतुन वाहतुक ठप्प होण्याच्या घटना घडत आहेत.
गोव्याला जाणारा कुसमळी मार्गे रस्ता कुसमळी गावाजवळील मलप्रभा नदीवरील नविन पुलाचे काम पूर्णत्वाकडे गेले तरी नविन पुलावरून अवजड वाहतुक ठप्प झाली आहे .
तसेच खानापूर अनमोड गावा रस्त्यावरून अवजड वाहने जाणे मुष्कील झाले आहे. कारण यामार्गावरील एका ठिकाणी रस्ता एका बाजुने खचला असुन अवजड वाहनाना पूर्ण बंदी करण्यात आली आहे.
तसेच खानापूर यल्लापूर कारवार गोवा रस्ता ही अवजड वाहतुकीला धोक्याचा ठरला आहे. या मार्गावरू अवजड वाहतुक ब़द आहे.
यासाठी खानापूर जाबोंटी रस्त्यावरून ही अवजड वाहने येजा करत आहेत.अरूंध्द रस्ता असल्याने अवजड वाहने दुहेरी वाहतुक करताना मातीत रूतुन जागीच बंद होत आहेत .त्यामुळे वाहतुक दोन दोन तास ठप्प होऊण बससे उशीरा धावत आहेत .त्यामुळे शाळकरी व काॅलेजच्या विद्यार्थ्याना उशीरा झाल्याचा प्रकार मंगळवारी घडला .
त्यामुळे रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.