खानापूर प्रतिनिधी
सोमवारी दि.७ रोजी बेळगाव येथून गोव्याकेडे टाटा योध्दा वाहन क्रमांक ( के .ए .२५ ए.बी. ६६४० ) या वाहनातुन जवळ पास १९३० किलो वजनाचे गो मांस घेऊन जात असलेले वाहन व आरोपीना रामनगर चर्च जवळ पोलिसानी सदर वाहन पकडुन ताब्यात घेतले .
या गो मांसाची किंमत अंदाजे लाखो रूपयाची असुन वाहतुक प्रकारणी सिध्दाप्पा बाळाप्पा बंधुर (रा.वंटमुरी ता.बेळगांव) आणि क्लिनर राजू बाळू नाईक (रा.बेळगांव) या दोघाना ही पोलिसानी ताब्यात घेऊन त्याना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
सदर कारवाई रामनगर पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक महांतेश नाईक यांनी केले आहे.