#वाहन धारकातुन समाधान!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील इदलहोंड अंकले रस्त्याचे डांबरीकरण होऊन वर्षे ओलांडले नाही.तेच रस्त्यावर जागोजागी खड्याचे साम्राज्य पसरले याची दखल घेऊन संदेश क्रांती न्यूज मधुन बातमी प्रसिध्द होताच नुकताच इदलहोंड अंकले रस्त्याचे पॅचवर्काच्या डांबरीकरण कामाला सुरूवात झाली.
इदलहोंड गावापासुन जवळपास तीन ते चार किलोमीटर अंतराच्या पॅचवर्काच्या डांबरीकरण कामाला सुरूवात झाली. पॅचवर्क करून त्यावर डांबरीकरण करण्यात आल्याने वर्षभर रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत.त्यामुळे इदलहोंड, सिंगीनकोप, माळ अंकले ,झाड अंकले गावच्या नागरीकाना तसेच वाहनधारकाना या रस्त्यावरून ये जा करने सोय़ीचे होणार आहे.
गणेबैल टोलनाका चुकविण्यास वाहन धारक या रस्त्याचा करतात वापर!
बेळगांव पणजी महामार्गावरील गणेबैल टोलनाक्यावर टोल भरावा लागतो.यासाठी इदलहोंडमार्गे अंकले रस्त्याने वाहनधारकांची या जा सुरू असते. त्यामुळे आवजड वाहनामुळे रस्त्याची दुरावस्था झाली.
तेव्हा संबधीत कत्राटदाराने या रस्त्याचे पॅचवर्काचे डांबरीकरण चांगल्या दर्जाचे केल्याने. याभागातील नागरीकातुन आहे.
समाधान पसरले आहे.
