#सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील कोडचवाड ११० के व्ही उपकेंद्रात दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने सोमवारी दि.८ जुन रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजे पर्यत वीजपुरवठा बंद राहणार आहे.
कोडचवाड कॆ. व्ही. ११ फीडर मध्ये बसवनगर, जिक्कनूर, चिकदिनकोप, बिळकी, देमिनकोप्प,कारलगा,बीदरभावी, कामशिनकोप,कोडचवाड, कगनगी तसेच इतर संबधीत परिसरात वीज पुरवठा बंद राहणार आहे.
तसेच ३३ फीडर लोंढा,खानापूर तसेच ११० केव्ही एस डब्लू आर,टी एस एस खानापूर यांचा समावेश आहे.तसेच केव्ही फीडर अंतर्गत लैला शुगर, देवलती,गर्लगुंजी,करंबळ,लोकोळी,देवलती, मोदेकोप,काटगाळी,गणेबैल,खानापूर,
औधोगिक क्षेत्र, कोर्ट,हेब्बाळ, व लोंढा,खानापूर व इतर परिसरातील वीजपुरवठा खंडीत होणार आहे.
अशी माहिती खानापूर तालुका हेस्काॅमचे सहाय्यक कार्यकारी अभियंते प्रवीण बरगाले यानी दिली आहे.
