
श्रीमान आनंद बुध्दाप्पा गावडे
जन्म दि.२७\११\१९७८
संदेश क्रांती न्यूज :
देगाव ( ता.खानापूर ) गावचे सुपूत्र व भाजपचे कार्यकर्ते श्रीमान आनंद बुध्दाप्पा गावडे याचा बुधवार दि.२७ रोजी वाढदिवस यानिमित्त त्याचा परिचय!
खानापूर तालुक्याच्या अति मागासलेल्या जंगल भागातील देगाव सारख्या खेड्यात शेतकरी कुटूंबात २७ नोव्हेंबर १९७८ साली जन्म झाला. जंगलाने वेढलेल्या देगावात केवळ पाचवी पर्यतचे शिक्षण पुढील शिक्षणासाठी जंगलातुन जाणे म्हणजे हिंस्त्रप्राण्याचे भय ,मुसळधार पाऊस त्यामुळे इच्छा असुन शिक्षण घेता आले .त्यामुळे केवळ इयत्ता पाचवीपर्यतचे शिक्षण घेता आले. पुढील शिक्षणावर पाणी सोडुन गोव्याला कामाच्या शोधार्थ जावे लागले.
परंतु देगाव गावची आठवण स्वस्त बसु देत नव्हती. काही वर्षानंतर पुन्हा देगावला येऊन देगावच्या समाजकार्यात सहभागी झाले.
देगावच्या समाजकार्या बरोबर गेली २० वर्षे भाजप पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून आजतागायत देगाव परिसरात कार्यरत आहेत.
खानापूर तालुक्याच्या अति जंगल व मागासलेल्या देगाव सारख्या खेड्यात व परिसरात समाजसेवेसाठी वाहुन घेतले.
देगाव परिसरात कोणतेही संकट येवो.कोणतेही कार्य असो जातीने पुढे जाऊन ते काम यशस्वी पार पाडण्यास नेहमी आग्रेसर असणारे भाजपचे युवा नेते म्हणजे आनंद गावडे होय.
देगावच्या शैक्षणिक समस्या ,गावचा विकास करण्यासाठी नेहमीच आनंद गावडे याची तळमळ आज ही तशीच आहे.
त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!