
#खानापूर तालुक्यात २ दिवसात बेकवाड,गंगवाळी,प्रभूनगर व नंदगड गावात आत्महत्येचे प्रकार !
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसात बेकवाड,गंगवाळी ,प्रभूनगर गावात आत्महत्येचे प्रकार ताजे असताना शनिवारी दि.२६ रोजी नंदगड (ता.खानापूर ) येथील डी एम एस मंडळाच्या कन्या विद्यालयाचे मराठी विषयाचे शिक्षक संदीप प्रभाकर शिंदे ( वय ४३) यानी शनिवारी दुपारी शेतवाडीत झाडाला दोरीने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली.
. त्यामुळे खानापूर तालुक्यात दोन दिवसात चार जनानी आत्महत्या केली.
संदिप शिंदे याच्या पश्चात पत्नी,दोन मुलगे,आई, वडील ,भाऊ ,बहिण असा परिवार आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,संदिप शिंदे हे शनिवारी सकाळी रोजच्या प्रमाणे हायस्कूलवर गेले होते.परंतु दुपारी पोटात दुखत असल्याचे कारण सागुन रजा घेतली.व घरी जातो असे सागुन हायस्कूलमधून आले .त्याच ठिकाणी बाजुला काॅलेजमध्ये त्याच्या पत्नी प्राध्यापिका आहेत. दोघेही विनाअनुदानीत तत्वावर सेवा बजावत आहेत.त्याना सुध्दा न सांगताच तेथून आले .त्यामुळे त्याचिंत्तेत असतानाच त्याना ही बातमी कळली.
लागलीच पोलिसानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. व मृतदेह खानापूर सरकारी दवाखान्यात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
नंदगडचे निवृत्त मुख्याध्यापक पी.ए.शिंदे यांचे ते चिरंजीव होत. याप्रकरणाची नोंद खानापूर पोलिस स्थानकात झाली असुन पोलिस पुढील तपास करत आहेत.