
तालुक्याच्या पश्चिम भागातील मणतुर्गा,नेरसे,अशोकनगर सह नागुर्डा,मोदेकोप भागात टोळ्या दाखल!
#तालुक्यात हत्तीच्या अगमनाने ऊस उत्पादकांची धडपड!
#बेळगाव शुगर,बागेवाडी,संकेश्वर कारखाण्याना जातो ऊस !
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुका हा एकेकाळी केवळ भात पिकावर अवलंबुन असायचा.पण अलिकडे शेतकर्यानी भात पिकाबरोबर आता ऊसाचे उत्पन्न दुप्पटीने वाढविले आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील ऊसावर कर्नाटकासह महाराष्ट्र , गोवा राज्यातील साखर कारखाने चालतात.
नुकताच ऊसाच्या गळीत हंगामाला सुरूवात झाली असुन खानापूर तालुक्यातील पश्चिम भागातील मणतुर्गा,नेरसा,अशोकनगर,सह नागुर्डा,मोदेकोप,ओतोळी,त्याचबरोबर बेकवाड, हलशी भागात ऊस टोळया हजर झाल्या आहेत
यावेळी बोलताना मणतुर्गा गावचे ऊस वाहतुकदार शांताराम पाटील म्हणाले की,सध्या बेळगाव शुगर,बागेवाडी,संकेश्वर आदी साखर कारखाण्यानी गळीत हंगामाला सुरूवात केली असुन ऊस टोळ्यासुध्दा खानापूर तालुक्यात पाठवुन दिल्या आहेत.
एवढेच नव्हे तर बिहीरी ऊस टोळ्या आल्याने दिवसाकाठी १० ते १२ हजार टन ऊस खानापूर तालुक्यातुन बाहेरच्या साखर कारखाण्याना जात आहे.
हत्तीच्या त्रासाला शेतकरी कंटाळले!
यावेळी ते म्हणाले की खानापूर तालुक्यातील जंगल भागातील ऊस पिकाचे नुकसान हत्तीकडुन मोठया प्रमाणात होते.या भितीपोटी ऊस उत्पादक शेतकरी आपल्या ऊसाची लवकरात लवकर उचल व्हावी अशी अपेक्षा करत आहेत. त्यासाठी सध्या खानापूर तालुक्यातील दिवसाकाठी १० ते १२ हजार टन तालुक्याच्या बाहेर जात आहे.असे मत मणतुर्ग्याचे ऊस वाहतुक करणारे शांताराम पाटील यानी सांगीतले.