
#तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड ईश्वर घाडी यांच्याहस्ते सत्कार!
#विविध मान्यवरांची उपस्थिती!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर ( सुहास पाटील )
खानापूर तालुक्यातील भू- न्याय मंडळ (लॅंड ट्रिब्युनल ) सदस्यांच्या नियुक्त्या सरकारने जाहिर केल्या.
यावेळी खानापूर तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष व निलावडे ग्राम पंचायतीचे सदस्य ( कांजळे) गावचे रहिवाशी विनायक मुतगेकर यांची भू लवाद न्याय मंडळ ( लॅंड ट्रिब्युनल )सदस्यपदी निवड झाल्याबद्दल खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांच्या नेतृत्वाखाली
सत्कार सोहळा नुकताच पार पडला.
सत्कार सोहळ्याला काॅग्रेस नेते यशवंत बिरजे,महादेव घाडी, विद्यानगरातील निवृ़त्त मुख्याध्यापक ए बी मुरगोड, पांडु देसाई, गोपाळ घाडी,मंजुनाथ बागेवाडी,गुंडु खांबले, शंकर पाटील,बाळू पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी खानापूर तालुका काॅग्रेस अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यानी प्रास्ताविक करून उपस्थिताचे स्वागत केले.
यावेळी विनायक मुतगेकर यांची भू- लवाद न्याय मंडळ (लॅंड ट्रिब्युनल ) सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सपत्नीक शाल,काॅग्रेस पक्षाचा पट्टा ,पुष्पगुच्छ व पेढा भरून त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना अँड.घाडी म्हणाले की माजी आमदार व ए .आय.सी.सी.प्रधान कार्यदर्शी डाॅ.अंजली निंबाळकर याच्या प्रयत्नाने पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या शिफारशीनुसार खानापूर भू न्याय मंडळ सदस्य पदी निवड झाली.खरोखरच विनायक मुतगेकर हे प्रयत्नवादी असुन सतत समाज सेवेचे काम करतात .सरकारी कार्यालयावर त्याचा नेहमीच दबीव असतो. त्यांच्या कार्याची दखल घेऊन माजी आमदार डाॅ अंजली निंबाळकर यानी विनायक मुतगेकर यांची नावाची शिफारस केली. त्यामुळे सदस्यपदी निवड झाली. ते २००४ पासुन काॅग्रेसच्या अनेक कार्यक्रमात सहभागी होऊण आपल्या भागाचा विकास साधला आहे.त्याच्या निवडीमुळे तालुक्यात अभिनंदन होत आहे.
यावेळी काॅग्रेस नेते यशवंत बिरजे, महादेव घाडी यानी विचार व्यक्त केले.
शेवटी सत्काराला उत्तर देताना सत्कारमुर्ती विनायक मुतगेकर म्हणाले की, कोणत्याही पदाची अपेक्षा नव्हती. केवळ खानापूर तालुक्याचा उमेदवार खासदार व्हावे.ही एकच तळमळ मनात होती.म्हणून माजी आमदार डाॅ.अंजली निंबाळकर याच्या पाठीशी निवडणुकीत ठामपणे उभा होतो.
त्याची तळमळ तालुक्याच्या विकासासाठी धडपड आज तितकीच आहे
माझ्या ध्यानीमनी नसताना मला लॅड ट्रिब्यूनल सदस्य पदी निवड केली.त्यामुळे त्याचा मी सदैव ऋणी आहे.
व प्रत्येकाच्या आडचणी सोडविण्यासाठी मी २४ तास कार्यरत राहिन असे सांगीतले.
यावेळी विद्यानगरातील नागरीक उपस्थित होते.