
#अभ्यास व उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर (सुहास पाटील )
खानापूर शहरातील समर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये विद्यार्थ्याच्या अभ्यासासाठी व उज्वल यशासाठी जीवन विद्या मिशन यांच्याविद्यामानाने व्याख्यानमालाचे आयोजन नुकताच करण्यात आले होते.
यावेळी स्वाँफ्टवेअर इंजिनिअर प्रफ्फुल गुरव यानी बोलताना म्हणाले की, विद्यार्थ्याच्या जीवनात अमुल्य देणगी म्हणजे अभ्यास होय.आपण समाजाच काही तरी देण लागत याची जाणीव करून देऊन श्री सदगुरू वामन पै यांच्या विचारातुन त्यानी समर्थ इंग्रजी शाळेच्या इयत्ता सातवी ते दहावी पर्यतच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.
प्रारंभी हायस्कूलच्या प्राचार्या सौ दिव्या डी.नाडगौडा यानी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
यावेळी व्यासपिठावर प्रमुख अतिथी म्हणून शांताराम पवार उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार प्राचार्या सौ दिव्या डी नाडगौडा यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली.