#एकजन रामनगरचा तर दुसरा खानापूर(तोपिनकट्टी)चा!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
रामनगर ( ता.जोयडा) येथील भारतीय लष्करी जवान शशिकांत गोसावी (वय ४६) यांचे मंगळवारी पंजाब मधील पठाणकोट येथे पोटातील आजाराने निधण झाले. गेली २४ वर्षे त्यानी भारतीय लष्करीत सेवा बजावत होते. येत्या सहा महिण्यात ते सेवानिवृत्त होणार होते. परंतु दोन दिवसा पुर्वीच पोटात होणार्या तीव्र वेदनेने उपचार दरम्यान मृत्यू झाला.
गुरूवारी दि ३१ रोजी रामनगर येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ही घटना ताजी असतानाच
मुळचा तोपिनकट्टी ( ता.खानापूर) सध्या राहणार विद्यानगर खानापूर येथील भारतीय लष्करी जवान सुरज मोहन द्रौपदकर (वय २९) याचा गुरूवारी दि.३१ रोजी दुपारी दुचाकी वरून खानापूरकडे येत असताना पणजी बेळगाव महामार्गावरील प्रभनगर जवळ दुचाकीवरील निंयंत्रण सुटल्याने दुभाजकला दुचाकी आदळल्याने व उडून जाऊन दुभाजकला आपटल्याने त्यात डोकीला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
सुरज द्रौपदकर हा अविवाहित असुन भारतीय लष्करीत गेली १० वर्षे सेवा करत होता.गेल्या काही दिवसापूर्वीच तो सुट्टीवर आला होता.
बेळगावुन खानापूराकडे दुचाकीवरून येताना हा आपघात घडला.
त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
दोघे ही भारतीय लष्करी जवान दोन दिवसाच्या अतंराने निधन झाले.
त्यामुळे दोन्ही कुंटूबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला.
एकापाठोपाठ एक असे दोन भारतीय लष्करी जवानाचे निधन झाले. हे दोन्ही तालुक्यातील जनतेच्या मनाला चटका लावून गेल्याचे दु:ख होत आहे.