#खानापूर डीसीसी बॅकेत बदल घडविण्यासाठी सर्व तालुका एकवटणार!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
कधी नव्हती इतकी चुरस बेळगाव जिल्हा डीसीसी बॅकेच्या निवडणुकीत खानापूर तालुक्याच्या कानाकोपर्यातुन होताना दिसत आहे.
बेळगाव जिल्हा डीसीसी बॅकेची निवडणूक १९ आँक्टोबर रोजी होणार आहे.याला अजुन तीन महिण्याचा कालावधी असताना मात्र खानापूर तालुक्यात डीसीसी बॅकेत बदल व्हावा. यासाठी ही निवडणुक नव्या चेहर्याला जिंकण्यासाठी सर्वानीच कंबर खेचली आहे.हे या निवडणुकीचे खास वैशिष्ठ्य आहे. तेव्हा आता पासुन निवडणुक जिकण्यासाठी प्रचाराचा धुराळा उडत आहे.
यानिवडणुकीत इच्छुक उमेदवारीसाठी आजी ,माजी, आमदारांची कसब लागुन आहे. त्यामुळेच खानापूर तालुक्यातील ५८ पीकेपीेएस संघाच्या संचालाच्या गाठीभेटी घेण्यास इच्छूक उमेदवार तालुक्यात फिरताना दिसत आहे. खानापूर तालुक्यातील ५८ पीकेपीएस संघा पैकी ३० संघाची तरी एकी करण्यात इच्छूक उमेदवारांचे प्रयत्न सुरू आहेत.तरच यश पदरी पडणार.
मागील वेळी अतितटीच्या सामान्यात निसडता भराभव झालेेल्याना आता तरी शाहणपणा येतो काय हे पाहायचे आहे. मागील निवडणुकीवरून यंदा यश मिळेल अशी चर्चा खानापूर तालुक्यात सुरू आहे.त्यामुळे पहिल्यांदाच नवा चेहरा खानापूर डीसीसी बॅकेवर झळकणार की काय? असे सर्वाना वाटत आहे.
नव्या चेहर्यासाठी सगळी धडपड!
गेली २० वर्षे एकच चेहरा खानापूर डीसीसी बॅकेवर झळकत असल्याने खानापूर डीसीसी बॅकेची प्रगती दिसुन आली नाही.खानापूर तालुक्यातील एका पदवीधर युवकाला व मराठी युवकाला नोकरीची संधी मिळाली नाही. शेतकर्याचे भविष्य कधी उज्वल झाले नाही.खानापूर तालुक्यातील मराठी शेतकरी चिखलात रोवला गेला तो त्यातुन उठलाच नाही.त्याला बळच मिळाले नाही. म्हणून खानापूर तालुक्याचा शेतकरी गरीब व कर्ज बाजारी राहिला.
हे सर्व मोडीत काढण्यासाठी आजी माजी आमदारानी जोराचे प्रयत्न लावले आहेत.सर्वजन एकवटुन कामाला लागलेच तर खानापूर डीसीसी बॅकेत बदल घडणार.
यासाठी व्यक्तीगत संपर्क ,गाठीभेटी, बैठका,आणि अर्थकरण याच गोष्टीवर अवलंबुन आहे.
त्यातच फोडाडीचे राजकरण या सर्व घाडामोठी वरून तीन महिण्यात बराच काही बदल घडुन येणार यात शंका नाही.