#बेळगाव व्ही टी युनिव्हर्सिटीमध्ये टेलिफोन असिस्टंट म्हणून २०वर्षाच्या सेवेतुन निवृत्त!
संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
खानापूरचे सुपूत्र व बेळगाव येथील विश्वेश्वरय्या टेक्नाॅलाॅजिकल युनिव्हर्सिटी मधुन टेलिफोन असिस्टंट म्हणून गेली २० वर्षाची प्रदिर्घसेवा बजावलेले अंध उमेश चिन्नप्पा जवळी हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले.
सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सत्कार सोहळा पार पडला. सत्कार सोहळ्याला विद्यापिठाचे कुलगुरू श्री रंगास्वामी, प्रो. श्री श्रीनिवास, प्रो.शंमुखप्पा व इतर प्राध्यापक उपस्थित होते.
यावेळी कुलगुरू श्री रंगास्वामी यांच्या हस्ते म्हैसुर फेटा,शाल व चंदनहार घालुन सत्कार करण्यात आला.
सत्कार करताना कुलगुरू श्री रंगास्वामी म्हणाले की अंध उमेश जवळी हे प्रामाणिकपणे गेली २० वर्षे यशस्विरीत्या सेवा बजावली. आपल्या सहकार्यासह व मित्र परिवारासह आपली सेवा आनंदाने घातली. त्याचे उर्वरित आयुष्य सुखासमाधानाचे जावो. अशी सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी विश्वेश्वरय्या टेक्नाॅलाॅजिकल युनिव्हर्सिटीचे कुलसचिव ,प्राध्यापक व कर्मचारी तसेच मित्रपरिवार तसेच नागरीक उपस्थित होते.