संदेश क्रांती न्यूज :
खानापूर प्रतिनिधी
दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळ खानापूर यांची व्यापक बैठक रविवार दि. २२ रोजी खानापूर येथील शिवस्मारकात सकाळी 11 वाजता होणार आहे. मंडळाच्या सर्व सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दि. संत गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे अध्यक्ष भैरु कुंभार असतील. बैठकीत एप्रिल महिन्यात होणार्या संत शिरोमणी गोरा कुंभार यांची पुण्यतिथी तालुकापातळीवर साजरी करण्याबाबत चर्चा होणार आहे. तरी सर्व सदस्यांनी शिवस्मारकात वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन उपाध्यक्ष सोमनाथ कुंभार, सचिव परशराम पालकर, खजिनदार नागाप्पा उत्तूरकर यांनी केले आहे.

