#गेल्या १० वर्षापूर्वी सैन्यात भरती झाला होता!
#चार दिवसापूर्वीच सुट्टीवरआला होता!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
मुळचा तोपिनकट्टी ( ता.खानापूर) सध्या राहणार विद्यानगर खानापूर येथील भारतीय सैनिक सुरज मोहन द्रौपदकर (वय २९) याचा गुरूवारी दि.३१ रोजी दुपारी दुचाकी वरून खानापूरकडे येत असताना पणजी बेळगाव महामार्गावरील प्रभनगर जवळ दुचाकीवरील निंयंत्रण सुटल्याने दुभाजकला दुचाकी आदळल्याने व उडून जाऊन दुभाजकला आपटल्याने त्यात डोकीला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
सुरज द्रौपदकर हा अविवाहित असुन भारतीय लष्करात सेवा करत होता.गेल्या चार दिवसापूर्वीच तो सुट्टीवर आला होता.
बेळगावुन खानापूराकडे दुचाकीवरून येताना हा आपघात घडला.
आपघातानंतर या परिसरातील नागरीक जमा झाले.लागलीच खानापूर पोलिसाना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतले. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला .
मुळचा तोपिनकट्टी गावाचा पंरतु अनेक वर्षापासुन खानापूर विद्यानगर येथे वडीला सोबत व अविवाहित भाऊ प्रल्हाद सोबत स्थायीक झालेला व वडील ही माजी सैनिक होते . गेल्या वर्षीच आईचे ही निधन झाले होते.
जवान सुरजच्या निधनाने द्रौपदकर कुटंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर विद्यानगरात हळहळ व्यक्त होत आहे.