# खानापूर तालुका काॅग्रेस पक्षाच्यावतीने नगरपंचायतीला निवेदन!
संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
खानापूर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनेव खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी यांच्या नेतृत्वा खाली गुरूवारी दि.३१ जुलै रोजी खानापूर नगरपंचायतीला निवेदनाव्दारे खानापुर शहरातील रस्त्याचे खड्डे बुजवा तसेच खानापूर येथील स्मशानभूमी मधील साफसफाई ( स्वच्छता) करण्यात यावी.अशा अशयाचे निवेदन खानापूर नगरपंचायतीला निवेदन सादर करण्यात आले .
या निवेदनात म्हटले आहे की गणेश चतुर्थी जवळ आल्याकारणाने गोवा महाराष्ट्र व इतर ठिकाणाहून गणेशभक्त हजारोंच्या संख्येने येतात. परंतु त्यांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. या अगोदर सुद्धा अनेक खड्ड्यांमध्ये पडून अनेक गणेश भक्त मूर्ती आणताना त्यांना त्रास सहन करावा लागला आहे .तेव्हा नगरपंचायतीच्या चिप ऑफिसरने तात्काळ शहरातील रस्त्यांचे खड्डे भरण्याची मागणी निवेदनात करण्यात आली . तसेच खानापूर येथील स्मशानभूमी मोक्षधाम मधील पालापाचोळा खड्डे व इतर पाण्याची टाकी व लाइटाची सुविधा करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण अंत्यविधी ला आलेल्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
यावेळी नगरपंचायतीचे अभियंते गंगाधर कांबळे यांनी निवेदनाचा स्वीकार करून तात्काळ कारवाई सुरू करणार असल्याचे सांगितले यावेळी खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे ग्रामीण अध्यक्ष अँड.ईश्वर घाडी तसेच खानापूर ट्र्यूबूनल मेंबर व खानापूर तालुका ग्रामपंचायत युनियनचे अध्यक्ष विनायक मुतगेकर तसेच यशवंत बिरजे काँग्रेस नेते व सामाजिक कार्यकर्ते संदीप शेंबले व खानापूर येथील ज्येष्ठ नागरिक परसराम बिरसे व मोटापा गावडे नगरपंचायतीचे प्रेमानंद नाईक उपस्थित होते.