संदेश क्रांती न्यूज:
खानापूर प्रतिनिधी
मणतुर्गा (ता.खानापूर ) गावचे सुपूत्र आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आबासाहेब नारायणराव दळवी यांचा ७१ वा वाढदिवस नुकताच पुण्यात त्यांच्या कुटुंबीय व स्नेहीमंडळींच्या उपस्थितीत दि.३० जुलै रोजी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
हा खास सोहळा त्यांच्या पत्नी सौ. अरुंधती आबासाहेब दळवी कन्या तेजस्विनी दळवी मुलगा प्रसादसिंह दळवी व सू सौ गायत्री दळवी नातू यथार्थ व राजवीर यांनी आयोजित केला होता.
या प्रसंगी प्रारंभी ७१ कणकेच्या दिव्यांनी औक्षण करून आबासाहेबांचा सन्मान करण्यात आला. घरगुती पण संस्कारयुक्त वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात पुण्यात स्थायिक झालेल्या अनेक जुन्या मित्रपरिवारांनी उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना तेजस्विनी दळवी म्हणाल्या ती
ही आनंदघडी उपस्थित प्रत्येकासाठी संस्मरणीय ठरली. वडिलांबरोबरचा प्रत्येक क्षण हा शिकवण देणारा आहे. असं भावनिक मत व्यक्त केले.
अखेर वाढदिवसाचा केक कापल्यावर व सर्वांनी एकत्र मिळून ‘दीर्घायुष्यमंगलम्’च्या शुभेच्छा दिल्यावर हा सोहळा एक सुंदर कुटुंबीय व मैत्रीचं उदाहरण म्हणून संपन्न झाला.
आबासाहेब दळवी याच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त खानापूर शहरासह तालुक्यातील जनतेने आजी माजी आमदार व लोकप्रतिनीधीनी तसेच खानापूर तालुका महाराष्ट्र एकिकरण समिती तसेच बेळगांव समितीच्या नेते मंडळीनी फोनव्दारे शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा केला.